महाराष्ट्रराजकीय

वया बियाच्या भानगडीत पडू नका, वैयक्तिक जाऊ नका, नाहीतर महागात पडेल ; शरद पवारांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांचं ओपन चॅलेंज

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज येवल्यात घेतलेल्या जाहीर सभेत चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. पक्षात बंड करून सोडून गेलेल्यांना खडसावत त्यांनी मोदींना ही ओपन चॅलेंज दिलं. वया बयाच्या भानगडीत पडू नका, वैयक्तिक जाऊ नका नाहीतर महागात पडेल असा इशारा शरद पवारांनी यावेळी विरोधकांना दिला.

पवार म्हणाले मी टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे कारण माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. त्यामुळे मी माफी मागतोय. माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या असतील तर तुमची माफी मागणं माझ कर्तव्य आहे. परंतु अशी चूक परत होणार नाही असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला.

काय जण म्हणाले तुमचं वय झालय. वय झालंय खर आहे ८२ वर्ष झालेत पण गाडी काय आहे हे तुम्ही पाहिलय कुठं वया बयाच्या भानगडीत पडू नका, वैयक्तिक जाऊ नका नाहीतर महागात पडेल असं म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांना इशारा दिला.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज देताना पवार म्हणाले,
मध्यंतरी दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काँग्रेसवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे. आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ती शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील”,

या मतदारसंघाचा इतिहास हा मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये परकियांच्या विरुद्ध लढणाऱ्या तात्या टोपेंची ही भूमी आहे. या भूमीतील लोकांवर अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल, पण ते स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ती देण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्हा लोकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करायचं. ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आलो आहोत. या नाशिक जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचारांना साथ दिली आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये