भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर भागातील नाल्यांची माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह केली पाहणी

पुणे : राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्र.10 मधील कोथरूड परिसरातील मोकाटे नगर – कोथरूड डेपो, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शास्त्री नगर,लक्ष्मीकांत कॉलनी, भारती नगर, पूजा पार्क सोसायटी शेजारी,गादीया इस्टेट व आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
अनेक ठिकाणी प्रशासनाने व्यवस्थित काम केले असल्याचे यावेळी निदर्शनास आले तर काही ठिकाणी अत्यंत अडचणीत असणारे नाले साफसफाई करणे अत्यावश्यक असल्याने आज माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणी दरम्यान मा. सदानंद लिटके – उपअभियंता ड्रेनेज विभाग पुणे मनपा ,अजिंक्य वानखेडे – कनिष्ट अभियंता, पुनीत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.































