राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या निमित्ताने प्रभाग क्रमांक ११ मधील एआरएआय टेकडीवर वृक्षारोपण केले. गेल्या २५ वर्षांपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या राष्ट्रवादी आणि पुरोगामी विचार सरणीतून पक्षाने अविरतपणे महाराष्ट्राचं होत जोपासण्याचे काम केलं आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी व्यक्त केले.
मानकर म्हणाले, अजिदादांच्या सक्षम नेतृत्वात हीच परंपरा, पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करत आहोत. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांशी संवाद साधत पर्यावरणाचं महत्त्व सांगितलं. यावेळी महाराष्ट्रासह देशाला प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, कांताताई खिलारे, नवनाथ खिलारे, धनंजय पायगुडे, दत्ता गायकवाड, खरात ताई, दिलीप कानडे काका व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

























