पुणे शहर

चंद्रकांत मोकाटे यांनी कर्वेनगर येथे मंजूर केलेला उड्डाण पुल नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी आहे तसा केला असता तर आज… स्थानिकांनी व्यक्त केल्या भावना

कर्वेनगर भागातील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कर्वेनगर : कर्वेनगर परिसरात वाहतुकीची समस्या व कोंडी मोठया प्रमाणावर होतं आहे. कर्वेनगर ते वारजे उड्डाणपुल चौक दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी चांगली उड्डाणपूलाची योजना मंजूर करून घेतली होती पण ही योजना बदलून त्याऐवजी केवळ कर्वेनगर चौकातच फक्त उड्डाणंपुल केला गेला. या उड्डाणंपूलामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्याऐवजी वाढलीच आहे अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी आज व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज  कर्वेनगर व दुधाने वस्तीमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधून संवाद साधला ठिकठिकाणी त्यांच्या पदयात्रेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, माजी स्विकृत सभासद नंदू घाटे, दशहरी चव्हाण, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर, संतोष वाघमारे, जगदीश दिघे, रविराज इंगुळकर, अजय भुवड, किरण बराटे, वैशाली दिघे, पल्लवी नागपुरे डॉ अभिजित मोरे गोविंद थरकुडे आदी सहभागी झाले होते. मोकाटे यांची आज इंगळेनगर, दत्त दिगंबर कॉलनी, जावळकर वस्ती आदी भागात पदयात्रा झाली.

Img 20241020 wa0001435697684176070576

कोथरूड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)अध्यक्ष स्वप्निल दुधाने म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुल चौक दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उड्डाणंपूलाची योजना आखली होती ती मंजूरही केली. पण त्यांच्या नंतर आलेल्या लोकप्रतिनिधीनी त्यामध्ये बदल केला आणि फक्त कर्वेनगर चौकापुरताच उड्डाणंपुल केला गेला त्यामुळे वाहतुकीची कोंडी व समस्या दूर होण्याऐवजी ती वाढल्याचे चित्र आहे. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, डी मार्ट येथील चौक वाहतूक कोंडीने जाम होत आहेत. या परिसरात 50 हजाराहून अधिक नागरिक राहतात या वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड त्रास होत असून त्यांचा विचार कोण करणार ?

Img 20240404 wa0016281297658999536660438617

माजी स्विकृत सभासद नंदू घाटे म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे हायवे या टप्प्यातील मंजूर उड्डाण पूल अर्धवट केल्याने या परिसरात वाहतुकीची समस्या वाढली आहे. पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर यांनी सांगितलं की कर्वेनगर परिसरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ती सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. गोविंद थरकुडे म्हणाले की, या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होतं नाहीत.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये