पुणे शहर

कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्यातील उपक्रमांमुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल-नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे : प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर या प्रभागातील केळेवाडी भागात असलेल्या पुणे महानगरपालिका अंतर्गत कै. सुंदराबाई गणपत दवाखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या ३० ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी सदिच्छा भेट दिली. परिसरातील महिलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून व्हाव्यात या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या माध्यमातून असंख्य महिलांचे बीपी, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी स्त्रीरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच गरजेनुसार औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. परिसरातील महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Img 20260222 wa00066011961844530264196

नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती घेतली तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे व त्यांना वेळेवर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राबवलेल्या या उपक्रमाबद्दल रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले.

हर्षवर्धन मानकर म्हणाले, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल,   महिलांशी संवाद साधत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होऊन प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे हे कुटुंब व समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच प्रभागातील सर्व महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. प्रभाग क्रमांक ११ मध्ये आरोग्य, स्वच्छता व मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात येत असून भविष्यातही अशा प्रकारचे मोफत आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी दिली. 

या शिबिरास कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता संजीव वावरे, फार्मासिस्ट अरुण भगत, कानडे काका,नर्स पूनम चव्हाण, प्रगती पांडे, सोनाली चौधरी, अमोल पवार, सुदाम मारणे, सुनिता खरात, स्थानिक महिला आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये