पुणे शहर

युवकांना सायबर सुरक्षा क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी : डॉ. दीपक शिकारपूर

  

यशस्वी संस्था व डिजिटल टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न

पुणे : सायबर सुरक्षा हे प्रचंड वेगाने विस्तार होत असलेले व्यापक क्षेत्र क्षेत्र असून या क्षेत्रात युवा पिढीसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.यशस्वी स्किल्स लिमिटेड व डिजिटल टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायबर सिक्युरिटी सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन अँड डिजिटल फॉरेंसिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

Img 20251125 wa01788344877527023851533

या कार्यक्रमात बोलताना यावेळी ते म्हणाले की,युवा पिढीने उज्वल करिअरसाठी केवळ पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता पदवी शिक्षण घेत असतानाच सायबर सुरक्षा तंत्रज्ञानाच्या कौशल्य अभ्यासक्रमांचा अंगीकार करायला हवा. सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन आणि डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकून स्वतःला स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी अद्ययावत करायला हवे, असेही शिकारपूर यांनी सांगितले.तसेच युवा पिढीने जपानी भाषा अवगत करून भारतीय तरुणांसाठी जपानमध्ये मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायला हवा, असे आवाहनही शिकारपूर यांनी केले.

Img 20260221 wa00337727204769901223581

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे त्यांच्या मनोगतात म्हणाले की, सायबर गुन्ह्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना दुसरीकडे या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर सुरक्षेचा पुरेसं ज्ञान असणारे मनुष्यबळ कमी आहे.त्यामुळे या क्षेत्रातील कौशल्य आणि सखोल ज्ञान असणारे कुशल मनुष्यबळ तयार होणं ही काळाची गरज आहे.त्यावेळी बोलताना विविध उदाहरणांचे दाखले देत त्यांनी सायबर गुन्ह्यांची तीव्रता आणि व्याप्ती किती भयावह झाली आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी युवा पिढीने सायबर योद्धा कोर्स द्वारे स्वतःला सज्ज करावं असे आवाहन भानुप्रताप बर्गे यांनी केले.

Img 20260221 wa00345723128152694901078

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स चे डॉ. शिवाजी मुंढे यांनी हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामागील संस्थेची भूमिका विशद करत अभ्यासक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात यशस्वी संस्थेचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी राजेश नागरे यांनी सायबर सुरक्षा च्या अभ्यासक्रमाविषयी संक्षिप्त माहिती विद्यार्थ्यांना सादरीकरणाद्वारे दिली.


या कार्यक्रमात डिजिटल टास्क फोर्स चे संस्थापक डॉ. रोहन न्यायाधीश यांनी क्यू आर कोड द्वारे कशाप्रकारे सहजगत्या मोबाईल हॅक केला जातो याचे प्रात्यक्षिकासह उदाहरण देत आपली डिजिटल ओळख सुरक्षित ठेवावी आणि कोणतीही व्यक्तिगत माहिती सार्वजनिक समाज माध्यमावर उपलब्ध होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये