पुणे शहर

कर्वेनगर मध्ये मुक्या प्राण्यांसाठी AART Karvenagar संस्थेने उभारली चळवळ; रेस्क्यू पासून नियमित खाद्य पुरवठा पर्यंत मोठी कामगिरी 

पुणे : कर्वेनगर, पुणे येथील प्राणीप्रेमींची संस्था AART Karvenagar ने गेल्या १५ वर्षांपासून अथक प्रयत्न केले आहेत. ही संस्था भारती तांबे यांनी सुरू केली असून, त्यानंतर अनेक समर्पित कार्यकर्त्यांनी ही चळवळ पुढे नेली आहे.

या चळवळीमध्ये प्रशांत आकुत, क्षमा कुलकर्णी, अर्पिता, गायत्री गानू,अजय आडकर, कपिल पटवर्धन, व्यासंगी कडेकर, गीतल भापकर, प्रणिल प्रधान, गोधले, अजय धोंगडे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच आणखी बरेच स्वयंसेवक या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत.

Img 20260222 wa00066011961844530264196

AART Karvenagar ही संस्था प्रामुख्याने खालील उपक्रम राबवते:

प्राण्यांचे लसीकरण (Vaccination)

नसबंदी (Sterilization)

रेस्क्यू ऑपरेशन्स (Rescue), विशेषतः सापांच्या रेस्क्यूचे समन्वय

रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना (मुख्यतः कुत्रे आणि मांजरे) नियमित खाद्यपुरवठा

संस्थेने Canines Control Board आणि इतर सामाजिक संस्थांसोबत मिळून केलेल्या कामाचा अहवाल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

आकडेवारी (एकूण कामगिरी):

सुमारे ३०० कुत्र्यांची नसबंदी केली.

१५० हून अधिक केसेसमध्ये कुत्रे, मांजरे आणि गाईंची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे त्याच ठिकाणी सोडले.

२०२५ वर्षातील कामगिरी:

५२ कुत्र्यांची आणि १६ मांजरांची नसबंदी.

अनेक नागरिक सकारात्मक पद्धतीने पुढे येऊन आपल्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी या सेवा वापरत आहेत, ज्यामुळे संस्थेला विशेष आनंद होत आहे.संस्थेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि डोनर्स यांचे मनापासून आभार! अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन मदत करावी, अशी अपेक्षा आहे. प्राण्यांच्या कल्याणासाठी योगदान देण्यास इच्छुक असाल तर खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधा:

+91 98222 54509

+91 98228 16442

9881257560

AART Karvenagar सारख्या संस्था पुण्यातील प्राणी कल्याण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्याला सर्वंकष पाठिंबा देऊया!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये