महाराष्ट्र

रघुनाथ कुचिक प्रकरण; पीडित सापडली

पुणे : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी 24 वर्षीय तरुणी अचानक गायब झाल्याचा आरोप भाजपने केला होता.  संबंधित तरुणी ही दोन दिवसांपासून गायब होती. अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर ती गोव्यातील एका गावात सापडली आहे. तिला इंजेक्शन देऊन जबरदस्ती पळवून नेण्यात आलं होतं, असा धक्कादायक दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची आपण पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मला सांगायचं आहे की, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्यारीत केलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. पण काल रात्री साडेअकरा वाजता तिचा फोन मला आला होता. मी कुठे आहे ते मला माहिती नाही. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. रात्रीची वेळ होती. मी तिला म्हटलं आजूबाजूला घरे असतील. तिथे कुणाचातरी दरवाजा ठोठव आणि माझ्याकडे मोबाईल दे. म्हणजे तू कुठे आहे ते ठिकाण मला त्यांच्याकडून कळेल. त्या पद्धतीने तिने केलं. एक गृहस्थ तिथे आले. त्यांनी गोव्यातील मडगावच्या कोलवा गाव असल्य़ाचं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना गोवा पोलिसांपर्यंत पीडितेला पोहोचवून द्या, अशी विनंती केली. पीडीतेशी बोलल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली.”

“पीडित मुलगी ही पुण्याला निघाली होती. पण तिला काही लोकांनी तिला अडवलं. यामध्ये पोलीसही होते. तिला इंजेक्शन देण्यात आलं. तिच्याकडून कोणत्यातरी पेपरवर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर काय झालं ते तिला समजलं नाही. त्यानंतर ती गोव्याच्या एका गावात आढळून आली, अशी माहिती पीडितेने स्वत: दिली”, असा दावा वाघ यांनी केला.

“पीडितेचा फोन झाल्यानंतर मी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलीस आता तातडीने गोव्याच्या दिशेला निघाले आहेत. पीडितेचे आई-वडिलवही तिथे पोहोचत आहेत. जबाबदार लोकांनी बेजबाबदार बोलू नये. तिचे आई-वडील घरी होते. मुलगी बेपत्ताच होती”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Shiv Sena leader Raghunath Kuchik) यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुण्यात बलात्काराचा गुन्हा (Rape case) दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती तरुणी गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात (abortion) केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये