पुणे शहर

पावसाच्या हजेरीत पार पडला कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा चौथा व शेवटचा दिवस

पुणे : भारताची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत आज कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा चौथा व शेवटचा कार्यक्रम “तालब्रम्ह” संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा या वर्षीच्या महोत्सवाचा अनुभव सांगितला. महोत्सवाला उत्साहाने प्रतिसाद देणार्‍या रसिक प्रेक्षकांचे आभार मानले.

Img 20220422 225955

या वर्षी १०,००० ते १२,००० रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक,कलाकार ,नियोजक निवेदक व रसिकप्रेक्षकांप्रती मुरलीधर मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर, गायक सुरेश वाडकर,गायिका उषा मंगेशकर यांचे विशेष आभार मानले. विशेष म्हणजे मान्यवरांसह सर्व व्यवस्थापन टीमचा देखील सत्कार केला गेला.

आजच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच “तालब्रह्म” सोहळ्यात उस्ताद तौफिक कुरेशी, गायिका कौशिकी चक्रवर्ती, सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया, पूर्बायन चॅटर्जी, तबलावादक रामदास पळसुले, मिलिंद कुलकर्णी या कलाकारांनी त्यांची कला सादर करीत कार्यक्रमाला रंगत आणली. आयोजक मुरलीधर मोहोळ व मोनिका मोहोळ यांनी या सर्व कलाकारांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

सुमारे अडीच तास संपूर्ण कोथरूड संगीताच्या स्वरांमध्ये रंगले होते. कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुरेल आवाजामुळे व इतर वाद्यांच्या साथीने प्रेक्षक वर्ग महोत्सवात रममाण झालेला पाहायला मिळाला‌. कोथरूडमधील रसिकच नाही तर पावसाने देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली‌. परंतु रसिक प्रेक्षक आणि कलाकार यांच्या सहकार्याने कार्यक्रमात थोडासाही व्यत्यय आला नाही.कार्यक्रमाची सांगता ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्याने झाली. तर सर्व रसिक प्रेक्षकांनी मोबाइलचा टॉर्च लावून लतादीदींना आदरांजली वाहिली. छायाचित्रकांनी हे दृश्य टिपले आहे. या वर्षी पेक्षा अधिक ताकदीने पुढच्या वर्षी हा सोहळा पार पडेल अशी खात्री आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी रसिक प्रेक्षकांना यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुप, गोखले कन्स्ट्रक्शन, रावेतकर हौसिंग ग्रुप, रांजेकर बिल्डर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., बुलढाणा अर्बन बँक लि., सुहाना मसाले, पी.एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले

Img 20220419 wa0007968353280963622575
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये