पुणे शहर

आनंदाची बातमी अशी भाजप नगरसेवकाची सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल मात्र उद्यानाचा विषय न्यायालयात प्रलंबितच

विनायक बेदरकर

पुणे :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे न्यायालया मध्ये प्रलंबित असलेल्या कोथरूड मधील जितेंद्र अभिषेकी उद्यानाचा विषयी महापालिका अधिकारी आणि जागा मालक यांची संयुक्त बैठक घेतली आणि हा प्रलंबित प्रश्न सुटला. अशी जाहिरात सोशल मीडियावर एका स्थानिक नगरसेवकांनी सुरू केली. मात्र हा वास्तवात हा प्रश्न अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आणि तो सोडविण्यासाठी पालिकेला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची आहे.(The good news is that the BJP corporator’s advertisement went viral on social media, but the issue of the park is pending in the court.)

सोमवारी दुपारी प्रभाग क्रमांक १३ मधील जितेंद्र अभिषेकी उद्यानाचा विषयी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जागा मालक आणि पालिका अधिकारी यांची बैठक घेतली. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी झालेली चूक दुरूस्त करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत उच्च न्यायालयात हा विषय निकाली काढण्यात येत नाही. तोपर्यंत हा विषय प्रलंबित च राहणार आहे. मात्र भाजपचे स्थानिक नगरसेवक जयंत भावे आणि त्यांच्या समर्थकांनी चंद्रकात दादा पाटील यांच्या प्रयत्नातून हा विषय सुटला असून उद्यान खुले होणार अशी जाहिरात सोशल मीडियावर सुरू केल्याने  प्रश्न न सुटताच केलेली जाहिरात हि निवडणुकांची लगीनघाईची चाहूल असल्याची प्रतिक्रीया स्थानिक नागरीक व्यक्त करीत आहेत.

काय आहे पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाचा विषय ?

IMG 20210131 WA0061

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भूसंपादन करताना केलेल्या चुकांमुळे कोथरूड भागातील बहुचर्चित पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाची जागा सात- आठ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असल्याने उद्यानाच्या कामासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.

कोथरूड भागातील राहुलनगर परिसरात पुणे महापालिकेच्यावतीने बारा वर्षांपूर्वी २००८ साली पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान विकसित करण्यास सुरुवात करण्यात आली. पूर्वी अस्तित्वात असलेले गाव व गावातील बारा बलुतेदार संकल्पना या उद्यानात साकारण्यात येणार होती.
       ‎उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा मोबदल्यापूर्वीच  जागामालकांनी ताब्यात दिली. उद्यानाच्या कामाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष जागेवर बारा बलुतेदारांसाठी गाळे ही बांधण्यात आले. बाग विकसित करण्यात आली. सिमाभिंतीचेही काम पूर्ण झाले. आणि किरकोळ कामे शिल्लक असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जागामालक पालिकेच्याविरोधात न्यायालयात गेले व उद्यानाला कुलूप लागले. ते दहा वर्षे जैसे थे च आहे.

काय आहे वाद ?

IMG 20210128 WA0172


पुणे महापालिकेच्यावतीने पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानासाठी आरक्षित असलेली राहुलनगर येथील जागा ताब्यात घेताना आरक्षित जागेपेक्षा अधिक जागा ताब्यात घेतली. आणि आरक्षित जागेचा मोबदलाही योग्य न देउ केल्याने जागामालक शिरीष भुजबळ, सुनील भिडे,नगरकर न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजु एकून घेतली. यावेळी महापालिकेच्यावतीने या उद्यानासाठी भूसंपादन करताना जादा जागा घेण्यात आली असून निवाडा पध्दतीत चुक झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. यावर न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close