पुणे शहर

खडकवासला मतदार संघाच्या ग्रामीण भागातून भाजप महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ..

खडकवासला :  खडकवासला मतदारसंघात भाजपा-महायुतीचे उमेदवार आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रचार व पदयात्रेची आज शिवगंगा खोऱ्यातील श्री तुकाई देवी मंदिर, कोंढणपूर येथे श्रीफळ वाढवून उत्साहपूर्ण सुरुवात झाली.  या प्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार यात्रेला मिळाला.

Img 20241106 wa00084538712866114792970

या प्रसंगी महायुतीतील माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला शिवसेना अध्यक्ष सतीश घाटे, माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, बाळासाहेब नवले, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरूण राजवाडे, खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, राजश्री नवले, राणी भोसले, अश्विनी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री भुमकर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांसह महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Img 20241020 wa0001435697684176070576

ग्रामीण भागातून प्रचाराचा शुभारंभ
आमदार भिमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करून ग्रामीण मतदारांचा चौथ्यांदा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन नागरिकांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत ग्रामीण भागातून चांगले लीड मिळाले होते.  गेल्या १३ वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी यावेळीही महायुतीसाठी पाठिंबा जाहीर केला असल्याचा विश्र्वास तापकीर यांनी व्यक्त केला.
आमदार तापकीर यांनी सांगितले की, “भाजपा-शिवसेना आणि महायुतीच्या सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

आज ” कोंढणपूर, कल्याण, सिंहगड, रहाटवडे, आर्वी, शिवापुर, खेड शिवापुर, श्रीराम नगर, गाउडदरा, गोगलवाडी यांसारख्या गावांना भेट देऊन तापकीर यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

आमदार भिमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेला नागरिकांचा अतिशय उदंड प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता, खडकवासला मतदारसंघात महायुतीसाठी  सकारात्मक वातावरण असल्याची चर्चा आहे.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये