तुमचा एक दिवस द्या, माझं आयुष्य तुमच्यासाठी : किरण दगडे पाटील.. भोरच्या सभेला विक्रमी गर्दी.. रायरेश्वर गडावर फोडला प्रचाराचा नारळ
भोर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणत्याही पक्षाचा मोठा नेता सभेला नसताना, पक्षाची ताकद नसताना अपक्ष उमेदवाराच्या सभेला झालेली गर्दी चर्चेचा विषय ठरली आहे. भोर मतदार संघातील भोर शहरात अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी घेतलेल्या जाहीर सभेला झालेल्या गर्दीने या मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट केले. रायरेश्वर गडावर प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी आज आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
भोर मध्ये महायुती चे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांची सभा पार पडली. यावेळी प्रस्थापित विरोधकांच्या कामांवर निशाणा साधत भोर,राजगड, मुळशी भागाच्या विकासाचा निर्धार करण्यात आला. यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, किरण दगडे पाटील मित्र परिवार, युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना किरण दगडे पाटील म्हणाले, सभा कशी असते हे सर्वांना माहीत आहे. सभेला लोक कसे आणले जातात हेही माहीत आहे पण ही सभा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची कौटुंबिक भेट आहे. हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या कुटुंबातील लोकांचा मेळावा आहे.
आज भोर आणि राजगड हे तालुके नसते तर महाराष्ट्र दिसला नसता कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात याच दोन तालुक्यातून केली. आज या तालुक्यांची काय अवस्था झाली आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज मी माझ्या प्रचाराचा नारळ रायरेश्वर मंदिरात फोडला. ज्या रायरेश्वर मंदिरात महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते मंदिर जागतिक तीर्थ क्षेत्र बनवण्याच माझ स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच आहे.
आज शिक्षण घेऊन हमाली करण्याची वेळ आपल्या मुलांवर आली आहे. मतदार संघातील मुलांना रोजगार नाही. शहरात जाऊन मिळेल ते काम त्यांना करावं लागत आहे. पण येथील सत्ताधाऱ्यांना एम आय डी सी आणता आली नाही. तुमच्याकडे पैसे आले तर कोणी आपल्या दारात येणार नाहीत अशी येथील सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसत आहे. पण तुम्ही मला संधी दिली तर येथील एम आय डी सी चा प्रश्न सोडवून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. मुलांसाठी क्रीडा संकुल, मुलींच्या विवाहासाठी मोफत कार्यालय, रस्त्यांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न सोडवले जातील. आज रायरेश्वर मंदिर परिसराची ११ एकर जागा येथील सत्ताधाऱ्यांनी संस्थेच्या नावाने घेतली आहे. मी थोपटे यांना मागणी करतो महाराजांची ती जागा परत करा. त्या बदल्यात आम्ही वर्गणी काढून तुम्हाला दुसरीकडे जागा घेऊन देतो.
मी आज अपक्ष निवडणूक लढवत आहे तर माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणला जात आहे. तुम्हाला काय पाहिजे ते देतो माघार घ्या अस सांगितलं जातं आहे. पण मला माझ्या तरुणांसाठी एम आय डी सी पाहिजे आहे, ते देणार आहेत का ?
आम्ही लोकसभेसाठी अजित दादांसाठी काम केलं. त्याचीच परत फेड अशी केली जात आहे का ? अजित दादा सांगता म्हणून तुम्ही आमचं निलंबन केलं जातं का ? आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. त्याचाच विचार धरेन चालणार आहेत. आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. माझ्यासाठी निवडणुकीच काम करणाऱ्या महिलांना ही त्रास दिला जात आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी संरक्षण द्यावं. आपल्या भोर मतदार संघाचा विकास साधायचा आहे. तुम्ही एक दिवस द्या मी तुमच्यासाठी माझं आयुष्य देईल.
यावेळी बोलताना अभिनेते , दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, इथ कोणत्याही पक्षाचा मोठा नेता आलेला नसताना सभेला एवढी गर्दी झालेली आहे याचा अर्थ तुमचा किरण दगडे पाटील यांच्यावर विश्वास आहे. ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह किटली आहे. आज निम्या अर्ध्या पक्षांची चिन्ह नवीन आहेत, त्यामुळे काळजी नाही. किटली ही तुम्ही घरघरात पोहचवाल. जो गोरगरिबांचा मी त्याच्या पाठीशी आहे. आज जे काय सुरू आहे त्यावरून उद्या महाराष्ट्रातील राजकारणाचा काळ हा अपक्षांचा असणार आहे. मला गॅरंटी आहे किरण दगडे पाटील उद्या आमदार असणार आहे.
पुढे तरडे म्हणाले, आठ वर्षांपूर्वी मी मी मुळशी पॅटर्न चित्रपटाचे कागद घेऊन दारोदार जात होतो मला शेतकऱ्यांसाठी चित्रपट काढायचा आहे मदत करा. पण त्यावेळी माझ्या मदतीला पहिला माणूस उभा राहिला तो किरण होता. मी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी चित्रपट काढतोय म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिले आज तुम्ही या जमीन वाचवणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा. उद्या पक्षांचे मोठे नेते येथे येतील प्रस्थापित आमदरांसाठी आश्वासन देतील आणि निघून जातील. त्यांनी आश्वासन पाळली नाही तर तुम्ही त्यांना जाब विचारायला जाऊ शकता का ? पण किरण दगडे पाटील कडे जाऊ शकता. आज मी इथ बोलतोय तर मलाही विचारू शकता. माझ्या निम्म्या चित्रपटांचं शूटिंग भोर परिसरातच होत असतं मलाही पकडू शकता. मुळशीच्या प्रत्येक गावात जाऊन मी किरण साठी मत मागणार आहे कारण तो सच्चा आहे. आता भोर मध्ये क्रांती होण्याच्या मार्गावर आहे.
नवनाथ पारगे: आधुनिक श्रावण बाळ कसा असावा हे किरण दगडे पाटील यांनी दाखवून दिलं आहे. लोकांना विसरलेल्या प्रस्थापितांविरुद्ध विरुध्द तयनी वेगळा लढा उभा केला. ज्याचं कष्ट दमदार असतं त्याच वागणं रुबाबदार असतं. किरण दगडे पॅटर्न हा रोजगार निर्माण करणारा असेल, महिलांना सन्मान देणारा असेल, विकासाला पुढं नेणारा असेल हे आज मी सांगू शकतो.
यावेळी सभा सुरू असताना सावित्री पालकर यांनी उठून बोलायला सुरुवात केली. आपल्या पोरांना नोकरी नाही त्यांना नोकरी द्यायची असेल तर किरण दगडे यांच्यांपाठीशी उभ राहील पाहिजे अस त्यांनी आपलं म्हणणं मांडलं
रायरेश्वर मंदिर जागतिक तीर्थ क्षेत्र बनवणार असं बोलणारा पहिला तरुण मी आज पाहिला आहे आणि त्यांचा हा विश्वास मला भावला आहे असं मत प्रा. नलावडे यांनी यावेळी व्यक्त केलं.