वारजेत आज पासून नऊ दिवस चालणार हरिनामाचा जागर

वारजे : वारजे येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर श्री गणेश मंदिराच्या “२९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने राजयोग प्रतिष्ठान व श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाच्या वतीने वार्षिक श्री गणेश उत्सव सोहळा व भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून हा हरिनामाचा जागर नऊ दिवस चालणार असल्याने वारजे परिसराचे वातावरण भक्तीमय होणार आहे.
शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ ते रविवार दि. ३० एप्रिल २०२३ या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडणार आहे. श्री गणेश मंदिर राजयोग सोसायटी येथून शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ सकाळी ८ ते ११ श्रींची भव्य पालखी मिरवणुक निघणार असून ११ ते २ यावेळेत श्री गणेश याग होम-हवन महाअभिषेक संपन्न होणार असल्याचे राजयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी सांगितले.
दिनांक २२ ते २९ एप्रिल दरम्यान रोज पहाटे ५ ते ७ काकड आरती, सकाळी ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथाभजन, दुपारी ५ ते ६ प्रवचन, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर महाप्रसाद असणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
- शनिवार २२ एप्रिल : ह.भ.प. विलास महाराज रकटे यांचे प्रवचन व ह.भ.प. जयश्रीताई येवले यांचे कीर्तन
- रविवार २३ एप्रिल : ह.भ.प. गुलाब महाराज सुर्यवंशी यांचे प्रवचन व ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन
- सोमवार २४ एप्रिल : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे प्रवचन व ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे कीर्तन
- मंगळवार २५ एप्रिल : ह.भ.प. कृष्णा महाराज माने यांचे प्रवचन व ह.भ.प. पंढरीनाथमहाराज गर्जे यांचे कीर्तन
- बुधवार २६ एप्रिल : ह.भ.प. सायलीताई देशमुख यांचे प्रवचन व ह.भ.प. आसाराम महाराज बढे यांचे कीर्तन
- गुरुवार २७ एप्रिल : ह.भ.प. नारायण महाराज मारणे यांचे प्रवचन व ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे कीर्तन
- शुक्रवार २८ एप्रिल : ह.भ.प. भक्तीताई हांडे-कुटे यांचे प्रवचन व ह.भ.प. शब्दप्रभु नरेंद्र महाराज गुरव यांची कीर्तन
- शनिवार २९ एप्रिल ह.भ.प. गणेश महाराज पारखी यांचे प्रवचन व ह.भ.प. धर्मराजमहाराज हांडे यांचे कीर्तन
- रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. संजयनाना धोंडगे महाराज (नाशिक)
यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद



