पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

पुणे : राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान पक्ष बांधणी, पक्षाची संघटनात्मक कामे, प्रत्येक युवती पदाधिकारी व कार्यकर्ती यांना काम करण्याची समान संधी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या आपण पार पाडू, तसेच पुणे शहरात युवतींचे संघटन करून पक्ष बळकटीकरणासाठी एकत्रित चांगल्याप्रकारे काम करूयात. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून महिला शक्ती एकत्र येत आहे. या माध्यमातून महिलांच्या संबंधित समस्या सोडविण्यासाठी या युवतींनी प्रयत्नशील राहायला हवे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा सोनाली गाडे, पुणे शहर युवती अध्यक्षा पूजा झोळे, कार्याध्यक्ष मयुरी तोडकर, सोनू थोरवे, निकिता गायकवाड, लावण्या शिंदे, श्वेता मिस्त्री,अश्विनी काळे, प्राजक्ता दळवी-ताम्हाणे आणि श्रेया तांबे यांची उपस्थिती होती.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये