पुणे शहर

कोथरूडमध्ये तलवार हवेत फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पवना डॅमजवळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात…

पुणे : मंगळवारी कोथरूड परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटा लावला नाही. म्हणून तलवार हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड आणि बावधन) याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पवना डॅमजवळील डोंगराळ भागात जावून मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अशोक बाळकृष्ण कळजकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या दुसर्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी ओंकार उर्फ आबा शंकर कुडले याने बॅनरवर त्याचा फोटो लावला नाही म्हणून चिडून जाऊन हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करण्यास सुरूवात केली.

Img 20230803 wa00041486684870724290474

त्यावेळी त्याच्या साथीदाराने त्याला मदत केली. कुडले आणि त्याच्या साथीदाराविरूध्द कोथरूड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुडले आणि त्याचा साथीदार त्यादिवशी पासून फरार होते. गुन्हे शाखेचे पोलिस कुडले आणि त्याच्या साथीदाराच्या मागावर होते. तो पवना डॅमजवळील डोंगराळ भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतः पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर  इतर सहकार्‍यांसह पवना डॅम परिसरात रवाना झाले. त्यांनी आणि पोलिस पथकाने कुडले आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001
Img 20230717 wa0012

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये