तृतीयपंथींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लवकरच निर्णय- अजित पवार

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा जल्लोषात पार पडला.
पुणे : तृतीयपंथींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा जल्लोषात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आमदार, आजी-माजी नगसेवक,कार्यकारिणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तृतीयपंथींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले, त्यावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही अजितदादांनी दिली.

तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी आणि अल्पवधित महिला वर्गमध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महिला वर्गातर्फे अजित पवार यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी ज्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे अश्या सर्वधर्मीय सामान्य कुटुंबातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी या महिलांनी अजितदादाना राखी बांधताना भविष्यातील त्यांच्या राजकीय जीवनासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या.















