पुणे शहर

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी यांना राष्ट्रवादी युवकचे रेनकोट वाटप.

पुणे : विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कोथरूड गुजरात कॉलनी येथील सफाई कर्मचारी यांना रेनकोट वाटपाचे कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले आपल्या आरोग्याची पर्वा न करता समाजाच्या स्वास्थ्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या आरोग्यदूतांना प्रोत्साहन देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नाही.या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,प्रथमेश नाईक,तेजस बनकर,पृथ्वी दहीवल,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये