पुणे शहर

प्रभाग ३१ कोथरूड, मयुर कॉलनीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना मनसे युतीच्या प्रचार रॅलीने राजकीय वातावरण तापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात

कोथरूड : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी आज प्रभाग क्रमांक ३१ कोथरूड मयूर कॉलनी मधील शिवसेना मनसे युतीचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे, ॲड. योगेश मोकाटे, सुप्रिया काळे, प्रज्ञा लोणकर यांच्या प्रचारार्थ  काढण्यात आलेल्या रॅलीने प्रभागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या रॅलीच्या सुरवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहत त्यांनी कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उमेदवारांची संवाद साधल्यानंतर रॅलीला जल्लोषात सुरवात करण्यात आली.

प्रभाग ३१ कोथरूड, मयूर कॉलनी मधील कोथरूड गावठाण, मयूर कॉलनी, गुजरात कॉलनी, परमहंसनगर आझादनगर, डहाणूकर कॉलनी, तेजसनगर अशा भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Img 48984994796169961837176

प्रचारादरम्यान केलेली विकास कामे आणि राबवलेले उपक्रम आम्ही लोकांसमोर ठेवली आहेत आणि काम करणाऱ्या उमेदवारांना मत द्या असे आवाहन आम्ही मतदारांना केल्याचे ॲड. किशोर शिंदे व ॲड. योगेश मोकाटे यांनी सांगितले.

शिवसेना मनसे युतीमुळे प्रभागातील ताकद वाढली असून या दोन्ही पक्षांना मानणारा खूप मोठा वर्ग या प्रभागात असल्याने तो आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. ॲड. किशोर शिंदे व ॲड. योगेश मोकाटे यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळात केलेली विकास कामे आणि जनतेशी ठेवलेला संवाद यामुळे प्रचारादरम्यान शिवसेना मनसे युतीच्या पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र प्रभागात पाहायला मिळाले. 

विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद आहे. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम पुढे असतो त्यामुळे आम्हाला नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत असून विजय आमचाच होईल असा विश्वास महिला उमेदवार सुप्रिया काळे व प्रज्ञा लोणकर यांनी व्यक्त केला.

Ssk011598320167584295870927
Img 20251125 wa01782121520512185783132

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये