पुणे शहर, जिल्हा

शिक्षकाच्या भूमिकेतील चंद्रकांत पाटील मुळशीतील गावकऱ्यांना भावले.

गांव चलो अभियानाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील मुळशीतील गावात

मुळशी : भारतीय जनता पक्षाच्या गांव चलो अभियाना अंतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नाणेगावाला भेट दिली. या भेटीत पाटील यांनी नाणेगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावच्या शाळेला ही त्यांनी भेट दिली. या भेटीत शाळेच्या मुलांना पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचे वाचन मुलांना करायला लावले. यावेळी वाचनात अडखळणाऱ्या मुलांना प्रेमाने जवळ करून वाचनास मदत केली. या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्यामधील शिक्षकाने सर्वांना भारावून टाकले.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण देशात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी गावात जाऊन राहण्याचा, तिथल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती ग्रामस्थांना देऊन; गावातील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या अंतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास करत आहेत. काल त्यांनी गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनात भाग घेतला. त्यानंतर ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

आज सकाळी गावातील महिला बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून, त्यांना माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या येजनांची माहिती दिली. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी नाणेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्यै वाचनाची गोडी निर्माण व्हावी; यासाठी गोष्टीची पुस्तके भेट दिली. तसेच, यापैकी काही विद्यार्थ्यांनीना पुस्तक वाचायला लावले.

यावेळी पाटील यांच्या सुचनेने गांगरुन गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रेमाने जवळ करून, त्यांना शाळेतील शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन वाचनात मदत केली. पाटील यांचे मुलांप्रती आणि शिक्षणाप्रतीचे प्रेम आणि आस्था पाहून ग्रामस्थांना ही सुखद धक्का बसला. यावेळी मुलांना चॉकलेट वाटप केले.‌

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये