पुणे शहर

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका सहाय्यक आयुक्तांना येईना जाग ;  नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच..

कर्वेनगर : पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे आहे का नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पदपथावर तसेच रस्त्याच्या कडेला पडणारे कचऱ्याचे ढीग त्यात साठणारे पावसाचे पाणी आणि त्यामुळे निर्माण दुर्गंधीतून वाढणारा आरोग्याचा धोका अशी परिस्थिती वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिसून येत आहे. याबाबत तक्रारी करूनही वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना जाग येईना असा आरोप केला जाऊ लागला आहे.

Screenshot 20250915 160552 gallery5757548945050415615
कर्वेनगर मधील भालेकर उद्यानाबाहेर पदापथावर साठवलेला कचरा आणि त्यातून मार्ग काढणारे नागरिक

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग अध्यक्ष प्रतिक नलावडे यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त राऊत यांना निवेदन देऊन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

Img 20250508 wa00018046597267745442111

प्रतिक नलावडे म्हणाले, कर्वेनगरमध्ये असणाऱ्या महापालिकेच्या कै. धोंडाबाई, रामभाऊ भालेकर उद्यानाबाहेर रस्त्याच्या कडेला पदपथावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा पडत असून त्यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी पडत असलेल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी महापालिकेच्या स्थानिक आरोग्य निरीक्षकांनी कचरा डेपो केला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. पावसाचे पाणी आणि त्यात पडत असलेला कचरा यामुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. उद्यानाला लागून हा कचरा पडत असल्याने या ठिकाणी नियमित व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पडणाऱ्या कचऱ्या बरोबरच याठिकाणी पदपथावर स्वच्छ च्या कर्मचाऱ्यांकडून कचरा साठवला जात असून या ठिकाणी कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Screenshot 20250915 160722 gallery8152942541197676113

या कचऱ्यामुळे उद्यानाच्या भिंतीला घुशी लागून तडे गेले असून ती पडण्याची शक्यता आहे. कचऱ्यामुळे भिंतीला घुशी लागल्या असून उद्यानात व आजूबाजूच्या सोसायट्यांमधील सापांचा वावर वाढला आहे. मुले पार्किंग मध्ये खेळत असताना साप निघत असल्याने भीतीचे वातावरण आहे.  या प्रकारामुळे कोणी दगावल्यास त्याला पालिका अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल असा इशारा प्रतीक नलावडे यांनी दिला आहे. 

Image editor output image 370205162 1757932966522231584534134124479
सोसायटीत निघालेला साप सर्प मित्राला बोलवून पकडण्यात आल्याने धोका टळला

या प्रकारामुळे गोल्डन पेटल, लक्ष्मीनारायण पार्क, चिंतामणी, मुक्ताई रेसिडेन्सी, अरवाना या सोसायट्यांमधील आणि मातोश्री कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात आरोग्य निरीक्षक नंदा प्रताप मॅडम यांच्या संपर्क साधूनही त्यांच्याकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  त्यामुळे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा विडा उचलला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

Fb img 1757841132875698734583622208205

निवेदन दिल्यानंतर गणपती नंतर या ठिकाणाची पाहणी करून योग्य कार्यवाही केली जाईल असे आवश्वासन महापालिका सहाय्यक आयुक्त राऊत यांनी दिले होते, मात्र गणपती जाऊन बरेच दिवस झाले तरी त्यांना हा नागरी प्रश्न सोडवण्याबाबत अजून जाग आलेली नाही यावरून सहाय्यक आयुक्तांना नागरिकांच्या आरोग्याशी काळजी नसल्याचा आरोप नलावडे यांनी केला आहे.  या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहेच पण कॅनॉल रस्ता, डिपी रस्ता याठिकाणी ही तीच परिस्थिती आहे. नागरिक हवालदिल झाले असून त्यांच्यामध्ये असंतोष पसरू लागला आहे. लवकरच स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना करावा लागेल असा इशारा नलावडे यांनी दिला आहे.

Img 20250913 wa02065865367835442147326

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये