पुणे महानगरपालिका निवडणूक: कोथरूड मतदारसंघातील निकाल जाहीर पाहा एका क्लिकवर…

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9, 10, 11,29, 30 31, मधील निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण सूस या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी अपेक्षे प्रमाणे विजयी चौकार मारत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या प्रभागात भाजपचे किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, अल्पना वरपे, रुपाली पवार हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने भुसारी कॉलनी मध्ये विजायी जल्लोष साजरा केला. भाजप उमेदवारांसमोर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित दगडे, शंकर केमसे, सुजाता भुंडे, जयश्री मारणे यांचा पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन मानकर, काँग्रेस पक्षाचे रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, दिपाली डोख, आणि भारतीय जनता पक्षाच्या मनीषा संदीप बुटाला विजयी झाले आहेत.
माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन मानकर आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अजय मारणे यांच्यात थेट लढत झाली असून या लढतीत मानकर यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाचे रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आणि भारतीय जनता पक्षाचे अभिजित राऊत यांच्या मध्ये थेट लढत झाली असून या लढतीत कदम यांनी विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक केली आहे.
तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दिपाली डोख आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार उर्मिला शिंदे यांच्या मध्ये लढत झाली असून या लढतीत दिपाली डोख या विजयी झाल्या आहेत. तर या प्रभागात भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजप च्या मनीषा बुटाला यांची काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नयना सोनार यांच्याशी लढत झाली. यामध्ये बुटाला यांनी विजय मिळवला.
भाजपचा क्रिम प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 29 हॅप्पी कॉलनी – डेक्कन जिमखाना मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पुनीत जोशी, सुनील पांडे, मिताली सावळेकर, मंजुश्री खर्डेकर या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
भाजपाचा आणखी एक क्रीम प्रभाग समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश माथवड, पृथ्वीराज सुतार, वासंती जाधव आणि जोस्ना कुलकर्णी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना मनसे युतीचे उमेदवार योगेश मोकाटे, किशोर शिंदे, प्रज्ञा लोणकर, सुप्रिया काळे यांचा पराभव केला आहे.
कर्वेनगर होम कॉलनी प्रभागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ बराटे, तेजश्री पवळे,रेश्मा बराटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार स्वप्निल दुधाने या प्रभागातून निवडून आले आहेत. या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक सुशील मेंगडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.



