आरोग्यपुणे शहर

पुण्यात नव्याने लॉकडाऊन नाही.- महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नव्याने कोणत्याही प्रकारचे लॉक डाऊन होणार नाही. असे  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.

मोहोळ म्हणाले, महापालिका काही दिवसांनी नवीन कंटेनमेंट झोनची निर्मिती करते. आणि ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाले आहेत. तिथे अजिबात रुग्ण नाही. तेथे कंटेनमेंट झोन वगळला.त्यामुळे नव्याने काही कंटेनमेंट झोन केले आहेत. त्या भागात थोडी व्यवस्था करायची म्हणून रस्ते, गल्ल्या त्या ठिकाणी पत्र लावणे. बंदोबस्त करणे. हा त्यातील भाग एक भाग असतो.

सिंहगड रस्ता क्षेत्रीत कार्यालयाचे पत्र ग्राह्य नाही.
महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय तर्फे ऑर्डर निघाली आहे. त्या ठिकाणच्या वॉर्ड ऑफिसर नी पत्र काढले आहे. या पत्रात दुकाने बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.मात्र अशी कोणतीही परिस्थिती येणार नाही.ही ऑर्डर ताबडतोब रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्तांना सांगण्यात आले आहे. अशी माहिती महापौरांनी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरात कोणत्या नव्या प्रकारचा लॉक डाऊन असणार नाही.

नव्याने काही मायक्रो कंटेनमेंट झोन केले असतील. त्या ठिकाणी या मधल्या काळात असलेली नियम आणि काही वेळा ठरवून दिलेल्या असतील त्याच पद्धतीने जनजीवन असेल असेही मोहोळ यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये