पुणे शहर

संजीव बजाज यांना धमकी; 11 कोटींच्या खंडणीची मागणी..

पुणे : बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांना धमकी देऊन त्यांच्याकडे 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देत ई-मेलद्वारे ही खंडणी मागण्यात आली आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाज फायनान्समधील अधिकारी युवराज मोरे (वय 32, रा. हडपसर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

बजाज फायनान्सचे संजीव बजाज, वरिष्ठ अधिकारी दीपक रेड्डी, दीपक बगाडी, यांना हा ई-मेल 28 नोव्हेंबरला आलेला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर संबंधित अर्ज विमानतळ पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला आहे.

Img 20220108 wa0160
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये