पुणे शहर

Chandani chowk चांदणी चौकात आज रात्री पुन्हा ब्लॉक पुन्हा स्फोट

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर येथील रस्त्याच्याकडेचे खडक फोडण्यासाठी मंगळवारी रात्री साडेअकरा ते दीड असा दोन तासांचा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मुंबई ते सातारा या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी हा ब्लॉक असणार आहे.

खडक फोडण्यासाठी 16 ठिकाणी होल्स पाडत स्फोट करण्यात येणार आहेत. हे स्फोट होताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच एका बाजूची लेन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई-सातारा या लेनवरील वाहतूक रात्री दीड वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळवण्यात येणार आहे.

Img 20220910 wa0003

काल देखील एका बाजूची टेकडी फोडण्यासाठी भर दुपारी ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र पूर्वसूचना न देता हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांना या ब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागला होता. यात काही शाळेच्या बस देखील अडकल्या होत्या. दीड ते दोन तास बस जागेवर उभी असल्याने विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही झाला. शालेय बस असल्याने मुलांनी रडारड केली होती.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये