महाराष्ट्र

राज्यात नाईट कर्फ्यू, कडक निर्बंधही लागू, सरकारकडून नवी नियमावली जारी

मुंबई : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे

राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय?

उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध

Screenshot 20211227 1402344603556305344739789

रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित.

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.

रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.

५०% नाट्यगृह, सीनेमागृह

राज्यातील हाँटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार.

बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

Img 20220108 wa0160
Img 20220108 wa00017959239917361251506
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Img 20220108 wa0171

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये