कोथरूडमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाचा थरार, सहा ते सात गाड्यांना उडवले ; अपघातात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू…
कोथरूड : कोथरूड पौड फाटा येथे मद्यधुंद अवस्थेत गाडी
चालवत एका टेम्पो चालकाने ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात सहा ते सात जण जखमी झाले आहेत, तर दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोथरूड मनसेचे पदाधिकारी असलेले श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांचं निधन झाले असून स्वतः श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सव काळात घडलेल्या या घटनेमुळे कोथरूडमध्ये शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री साडेदहा च्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. वेगात टेम्पो चालवत त्याने सुरुवातीला त्याने करिश्मा चौकातील सिग्नलवर दोन मुलांना उडवले. पौड फाटा येथील सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडून दोन दुचाक्यांना धडक दिली. यानंतर एका कारला टेम्पो जोरात धडकवला. करिश्मा चौका ते पौड फाटा हा थरार सुरू होता. यात सहा ते सात जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांना मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चांगला चोप दिला.
या घटनेनंतर पिकअप चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.