कोथरुड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त कोथरूडमध्ये वृक्षारोपण..

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाचे  औचित्य साधून कोथरुड मधील वेताळ टेकडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.  कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर चिटणीस संतोष डोख, सामाजिक कार्यकर्त्या दिपाली डोख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रथमेश डोख यांनी केले होते. Tree planting on behalf of Santosh Dokh in Kothrud on the occasion of NCP’s anniversary

यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, हर्षवर्धन मानकर, गणेश माथवड, डॉ. सुनिता काळे, ज्योती सूर्यवंशी, संजय खोपडे, निलेश शिंदे, संतोष मोहोळ, केदार मारणे, सचिन डाकले, बाळासाहेब मोकर, शुभम माताळे, श्रीकांत बालघरे, दीपा मोहिते, संतोष वरघडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व लावलेली झाडे जगवणे आवश्यक आहे. त्यामुळे वृक्षारोपणा बरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचे संतोष डोख यांनी सांगितले.

Img 20210611 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये