पुणे शहर
कर्वे रस्त्यावर पीएमपीएल बसच्या धडकेत दोन अंध विद्यार्थी गंभीर जखमी

पुणे : कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय मधील दोन अंध विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कर्वे रस्त्याने जाणाऱ्या पी.एम.पी.एल बस एन डी ए गेट ते स्टेशन बस क्रमांक १४४/१ समोर आल्याने झालेल्या अपघातात गरवारे महाविद्यालय मधील दोन अंध विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.या दोघांना हेल्प रायडर चे सदस्य संतोष पोळ यांनी सह्याद्री हॅास्पीटल येथे दाखल केले आहे. बसचे कंडक्टर काळे सोबत आहे जखमींवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती हेल्प रायडर चे प्रशांत कनोजिया यांनी दिली आहे.
कसब्यातून टिळकांना उमेदवारी? निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपाचे आवाहन पहा व्हिडिओ….




