पुणे शहर

पुणे महानगरपालिकेच्या अर्बन ९५ उपक्रमांतर्गत केळेवाडी मध्ये बालस्नेही करण्याचे टॅक्टिकल इंटरव्हेन्शनचे आयोजन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अर्बन९५ उपक्रमांतर्गत केळेवाडी कै. मामासाहेब मोहोळ. प्राथमिक विद्यालय याच्या प्रांगणात असलेल्या कम्युनिटी हॉल बाहेरील जागा बालस्नेही करण्याचे टॅक्टिकल इंटरव्हेन्शन पार पडले.  

केळेवाडी येथे वस्तीमधील ६ वर्ष्या खालील मुले व त्यांचे सांभाळकर्ते यांच्या गरजांना अनुसरून हा कार्यक्रम पार पडला. पुणे शहराचा बालकेंद्रित विकास करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर पालिका करीत असलेल्या विविध विकास कामाला अनुसरून हे एक महत्वाचे पुढचे पाऊल आहे. विशेष म्हणजे पुणे येथील ब्रिक आर्किटेक्ट कॉलेज च्या मुलांनी व त्यांच्या प्राध्यापकांनी डिसाईनिंग साठी विशेष मेहनत घेतली. 

या कार्यक्रमाच्या उदघाटनाची साठी पुणे महानगर पालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास, स्थानिक  मान्यवर हर्षवर्धन मानकर, मनपा चे अधिकारी असंग पाटील, विजया गायकवाड , मुख्याध्यापिका संगीता बारवे, बालवाडी शिक्षिका ,अर्बन 95 कार्यक्रमातील टीमचे मुकुंद दुधाळे श्री. अमीर पटेल , मन्सूर शेख ,  अर्बन डिसाईनर भाग्यश्री  व इतर सदस्य , वस्ती व शाळेतील मुले, विभागातील अंगणवाडी सेविका  उपस्थित होते.                                                          

Img 20240202 wa00034606059587729487622
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये