पुणे शहर

खासदार जनसंपर्क सेवा अभियानात नागरिकांकडून आलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश .

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभ कोथरूड विधानसभेतून..

पुणे : वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात आज कोथरूड मतदार संघातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची खासदार जनसंपर्क सेवा अभियानात भेट घेतली. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नावर तातडीने मुरलीधर मोहोळ यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे पहायला मिळाले. समस्येचे निराकरण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान ही यावेळी दिसून आले.

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून झाला.  कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद मिळाला.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत दिले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस  राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, युवा मोर्चासह सर्व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न करण्यात आले होते. याची तयारीही उत्तम झाल्याने गर्दी होऊनही नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम पार पडला.

‘आपले काम होईल’, या भावनेने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने निश्चितच या उपक्रमाचे समाधानही मोठे आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर नागरिकांचा येणारा प्रतिसादही निश्चितच तितकाच आनंद देतो अशा भावना उपक्रमा नंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये