महाराष्ट्र

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले व यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनसे पक्षाचे मनसे नेते राजेंद्र वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे चित्रपट सेना प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते रमेश परदेशी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला पाठींबा दिला होता. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी पुण्यामध्ये सभा घेतली होती.

विजयी झाल्यानंतर मोहोळ यांनी मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि आभार व्यक्त केले. ठाकरे यांनी मोहोळ यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Img 20240610 wa0014234599511973207107
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240614 wa00146014913648272342267
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये