कर्वेनगरमध्ये मोरया मित्र मंडळातर्फे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी ; पुरस्कार वितरण व विविध स्पर्धांचे आयोजन..

कर्वेनगर : कर्वेनगर : कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धांचे आयोजन ही या निमित्ताने करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे खारवडे गावाचे सरपंच लक्ष्मण मारणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. भारतीय इतिहास संशोधन मंडळ सदस्य मंगेश नवघणे आणि शिवशंभू व्याख्याते राकेश पिंजण सरकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर राकेश पिंजण सरकार यांचे संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान झाले.

मोरया मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. यंदा कर्तव्यदक्ष अधिकारी सुहास नारायण पांढरे यांना मोरया जीवन गौरव पुरस्कार , वयाच्या ७६ वर्षी लाखो किलोमीटर सायकलिंग करुन पर्यावरण वाचवा हा संदेश देणारे निरुपमाजी भावे यांना मोरया भूषण पुरस्कार, गेली सात वर्षे ससून येथे मृतदेहांचे शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टमचे काम करणारे व कोरोना काळात आपले कर्तव्य चोख बजावणारे विक्रांत विकास वशिष्ठ यांना मोरया रत्न पुरस्कार माजी महापौर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप आणि खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा मधुरा भेलके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.












याप्रसंगी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, चित्र रंगवणे स्पर्धा, ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा,आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ माजी नगरसेविका जयश्री मारणे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, काँग्रेसचे विजय खळदकर यांच्या हस्ते करण्यात आला.



यावेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत वत्कृत्व स्पर्धा : १४ वर्षांखालील गटात नगर जिल्ह्यातील सोहम अशोक वागस्कर याला प्रथम क्रमांक, पुणे येथील आराध्य लांडे द्वितीय क्रमांक, इशा नितीन बोराटे हिला तृतीय क्रमांक ,खुला गट प्रथम संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड येथील किशोर अशोक मगर, द्वितीय क्रमांक योगेन राजेंद्र सावंत (मुंबई), तृतीय क्रमांक वैष्णवी शहाजी पवार (इंदापूर), उत्तेजनार्थ पारितोषिक, प्रणिती पवार,(सांगली) सायली गायकवाड (उत्तर सोलापूर), आर्या गणेश झगडे(गुहागर रत्नागिरी) मल्हार वराळे (पिंपरी)
शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा : प्रथम क्रमांक हिंदवी रजपूत, द्वितीय क्रमांक अनमोल हुंदळेकर, तृतीय क्रमांक संजीवनी केंगार
भव्य चित्रकला स्पर्धा : प्रथम क्रमांक प्रथमेश दिपक जोशी द्वितीय क्रमांक योगेश सतीश वाकडे, तृतीय क्रमांक नेत्रा नवनाथ नायकवडी , चतुर्थ गजानन राक्षे उत्तेजनार्थ शाईस्ता सय्यद, सार्थक गायकवाड, समर्थ माने
भव्य चित्र रंगवणे स्पर्धा : प्रथम सिया गणेश चव्हाण द्वितीय क्रमांक कार्तिक नितीन पाटील तृतीय क्रमांक अनन्या भाऊसाहेब निर्मळ. उत्तेजनार्थ सुदर्शन रंभू यशराज राऊत. या स्पर्धकांनी पारितोषिके पटकावली.
कार्यक्रमांचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते. याप्रसंगी बोलताना मारणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी आम्ही व्याख्यान, स्पर्धाचे आयोजन करत आहोत छत्रपतींचे विचार घराघरापर्यंत पोहचवणे हाच आमचा उद्देश आहे. तसेच शिवरायांसारखी च संभाजी महाराजांची पण जयंती पारंपारिक पद्धतीने जगभर साजरी करा ,मोरया मिञ मंडळाच्या वतीने शिवशंभू भक्तांना आवाहन करण्यात आले.
यावेळी मोरया मित्र मंडळ अध्यक्ष रोहिदास जाधव, उत्सव प्रमुख ऋषिकेश जगताप, पुणे शहर राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रोहन पायगुडे, नंदिनी पाणेकर, आनंद तांबे, रेश्मा बराटे, खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संभाजी गावडे, मयुर बनकर, विरेश शितोळे, विष्णूपंत सरगर, गजानन कड, अमृत मारणे, अक्षय केसवड, गणेश गायकवाड, विनायक उभे, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, सुरेखा जोशी, रेणुका जावळे, संगिता काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार गणेश गायकवाड यांनी केले.

































