
कोथरूड : आज सकाळी केळेवाडीतील कै. सुंदराबाई राऊत हॉस्पिटल मध्ये सकाळी केळेवाडीत १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस नगरसेवक दीपक मानकर आणि नगरसेविका छाया अजय मारणे, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.
दररोज 10 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रभाग क्रमांक ११ मधील
वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यावेळी पुणे महानगरपालिका क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी अंजली टिळेकर,डॉ. अपराजिता नाग, अजय मारणे, दिलीप कानडे, अनितातलाठी, पल्लवी गाडगीळ, पूजा भूषण शिर्के, भूषण शिर्के तसेच राऊत दवाखान्यातील सर्व वैद्यकीय स्टाफ उपस्थित होते.
दीपक मानकर म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण सुरू करण्यात आले.तरी सर्व मुलांनी (covid 19) लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन करावे. किंवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन रजिस्ट्रेशन करावे.




