कोथरुड

निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा – प्रवीण तरडे

मुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने 100 कलावंताना मदतीचा हात

कोथरुड : पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात. पडद्यामागील कलाकारांचे हात राबत असतात त्यावेळी एखादा चित्रपट बनतो. कोरोना संकट असो किंवा इतर आपत्तीच्या काळात या कलाकारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असतात. त्यामुळे संकटकाळात पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्या मदतीसाठी  निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा बाजूला ठेवावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले. Producers and directors should keep some part of the profits for behind-the-scenes artists and technician

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने 100 कलावंताना मदतीचा हात म्हणून किराणा माल देण्यात आला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध गीतकार व शांताबाई ह्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेले कलावंत संजय लोंढे यांना धनादेश व एक महिन्याचे रेशन अशी मदत देण्यात आली. रविकिरण देसाई व ऋतुजा देसाई यांनी संजय लोंढे यांच्यासाठी ५ हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी, शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशनचे मोकळे, यास्मिन शेख, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

IMG 20210430 WA0001

तरडे म्हणाले,  चित्रपट यशस्वी झाले त्यामागे बॅकस्टेज आर्टिस्ट चा मोठा हात होता त्यामुळेच मी सामाजिक जाणीवेतून स्वामींच्या कृपेनें त्यांना मदत करू शकलो, मात्र संकटकाळासाठी कायमस्वरूपी मदत निधी उभा करणे काळाची गरज असल्याचे मत ही प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर राज्य सरकारने पडद्यामागील कलाकारांचा विचार करून अन्य राज्यांप्रमाणे मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली.

संदीप खर्डेकर म्हणाले, कलाकार हा वर्षभर आपले मनोरंजन करत असतो त्याच्या मेकअप आड त्याचे दुःख लपवून तो फक्त प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आणि कौतुकाचा भुकेला असतो मात्र ह्या संकटकाळात नाटकं, चित्रपट व मालिकांना मोठा फटका बसला असून अनेक कलावंत जगण्यासाठी धडपडत आहेत, अश्या सर्वांच्या प्रतीचे कर्तव्य म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन ने हे मदतकार्य आरंभीले असून जेथे कमी तेथे आम्ही हे आमचे ब्रीद असल्याचे ते म्हणाले.

मुकुलमाधव फाउंडेशन ने आत्तापर्यंत ८० हजार गरजूंना शिधा वाटप केला असून यापुढे ही हे कार्य सुरु राहील असे मोकळे म्हणाले. संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक, मंजुश्री खर्डेकर यांनी आभार प्रदर्शन तर योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये