पुणे शहर

पुण्यातील कलाकारांसाठी कमला नेहरू रुग्णालयात आठवड्यातून दोन दिवस लसीकरण ; दिपाली धुमाळ यांची माहिती

पुणे : आठवड्यातुन दोन दिवस कमला नेहरू हाॅस्पिटल मध्ये पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली.

Img 20210706 wa0021

दिपाली धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, विजय पटवर्धन फाऊंडेशन व राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रुबल अग्रवाल यांना पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी महानगरपालिकेच्या वतीने मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे.या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अग्रवाल यांनी या मागणीचा विचार करून आठवड्यातुन दोन दिवस कमला नेहरू हाॅस्पिटल मध्ये पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असे सांगितले आहे. यावेळी अभिनेते विजय पटवर्धन , राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील , माजी नगरसेवक बाबा धुमाळ,अभिनेते राजू बावडेकर ,अभिनेते योगेश सुपेकर , प्रसाद कुलकर्णी , गणेश गायकवाड उपस्थित होते

Img 20210701 wa0256

पुणे शहर सांस्कृतिक माहेरघर आहे. या पुणे शहरातील कलेच्या विविध घटकातील कलाकार आज कोरोनाच्या महामारीमुळे हतबल झाले आहे. नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलेवरती पोट असणाऱ्या कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे. पडद्यामागील कलाकार ही सध्या अडचणीत आहेत. कलाकारांचे महानगरपालिकेच्या माध्यमातुन कोविड लसीकरण झाल्यास त्यांना लहान स्वरूपाचे कार्यक्रम करणे सोयिस्कर होईल नाट्यगृह लवकरात लवकर खुली होतील व त्यांना बाहेरच्या कार्यक्रमास बोलवले जाईल त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. त्यामुळे पुणे शहरामधील कलाकारांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तातडीने चालू करण्याची मागणी आम्ही केली होती व ती मागणी मान्य झाली असून लवकरच कमला नेहरू रुग्णालयात कलाकारांसाठी आठवड्यातुन दोन दिवस लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये