देशविदेश

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन..


मुंबई  : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. Veteran actor Dilip Kumar passes away ..

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान  त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.  रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली . दिलीप कुमार यांनी 1940-70 अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.

आज अनेक नामांकित कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात.  इतका लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याने आज ९८ वर्षी जगाचा निरोप घेतला.

IMG 20210701 WA0256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये