पुणे शहर

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही गाडीतून फिरताना मास्कचे बंधन शिथिल करा !

लॉक डाऊन मध्ये नियम मोडल्याने नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या..

पुणे : मुंबई मधे खासगी वाहनातून फिरताना मास्क वापरण्याचे बंधन शिथिल करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या वतीने विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या कडे करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन खर्डेकर यांनी त्यांना दिले आहे. खरे तर गाडीतून फिरताना मास्कचे बंधन हेच अनाकलनीय होते कारण, घरात एकत्र विनामास्क राहणारे नवरा बायको किंवा अन्य कुटुंबीय स्वतःच्या गाडीत विनामास्क  बसल्यावर ते  कोरोनाग्रस्त होवू शकतात हेच न पटणारे होते. मात्र उशीरा का होइना मुंबई मध्ये योग्य निर्णय घेण्यात आला आहे असाच निर्णय पुणे विभागासाठी घेण्यात यावा असे खर्डेकर यांनी म्हंटले आहे.

तसेच कोरोना काळात लॉकडाउन दरम्यान अनेक नागरिकांवर नियम मोडल्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासाठी नागरिकांना आता कोर्ट कारवाईस सामोरे जावे लागत आहे आणि यामुळे आधीच गेली दहा महिने सर्व त्रासाने पिचलेल्या नागरिकांना या नव्या त्रासास सामोरे जावे लागणार आहे.

Img 20210116 wa0007

ज्याप्रमाणे राज्य सरकारने २०२० पर्यंतचे राजकीय खटले काढून टाकण्याची घोषणा केली त्याच धर्तीवर आय पी सी १८८ अन्वये दाखल केलेले खटले ही मागे घ्यावेत व त्याची प्रक्रिया त्वरित सुरु करावी व या संदर्भात राज्य शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठवण्यात यावा अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये