पुणे शहर

कोथरुड मध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जोरदार तयारी ; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पाहणी..

पुणे :  ६ मार्च रोजी मेट्रो लोकार्पणसह विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून कोथरूडच्या एमआयटी च्या मैदानात होणाऱ्या सभेत ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोथरुड मध्ये सभा होणार असल्याने कोथरुड कर याबाबत उत्सुक आहेत. एमआयटी कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या या जाहीर कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू असून याची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी, महा मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

देशाच्या पंतप्रधानांची सभा पुण्यातील कोथरुड मध्ये होत असल्याने या सभेत मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणेकरांच्या स्वप्नातला मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असून त्याचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कोथरुड मधील वनाझ ते गरावरे कॉलेज या टप्प्यातील  मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासही करणार आहेत. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्याला  एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Img 20220301 wa00007544378064912533200
Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00035521681856149145908

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये