अर्थजगत

LPG Cylinder Price : गॅस सिलेंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 मार्च 2022 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. नवीन किंमती आजपासून लागू होतील. याचा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो. या दरवाढीनंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवरील भार वाढेल आणि याचा फटका ग्राहकांनाही बसू शकतो. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 105 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 1962 इतका झाला आहे.

Whatsapp image 2022 03 01 at 8. 13. 02 am

दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपये इतकी झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 5 किलोच्या लहान एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. दिल्लीत आता 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 27 रुपयांनी महागला आहे. ग्राहकांना हा सिलेंडर आता 569 रुपयांना मिळणार आहे. तथापि, या कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या किमती डिसेंबर 2021 नुसार स्थिर असून मुंबई आणि दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलेंडरची किंमत 900 रुपये इतकी आहे. 

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये