पुणे शहर

पुणे महापालिकेत तीनचाच प्रभाग कायम ; बैठकीत तोडगा नाही.

मुंबई : आगामी पुणे, पिंपरी चिंचवड, आणि इतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तीन सदस्यीय प्रभाग निश्चित राहणार आहे. आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र आज झालेल्या वादळी चर्चेनंतरही मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धती कायम ठेवण्यात आली आहे.(Ward 3 remains in Pune Municipal Corporation; There is no settlement in the meeting.)

राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येत्या येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाचा फेरविचार होण्याचे सुतोवाच केले होते. तसेच काँग्रेसने दोन सदस्य प्रभाग रचना करण्यात यावी.असा ठराव दिला होता.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

या सर्व घडामोडी नंतर महानगरपालिकासाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित होईल. असा अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर एकमत होऊ न शकल्याने अखेर राज्यातील महानगरपालिका साठी तीन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित झाली आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये