पुणे शहर
गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद

पुणे : महावितरण कंपनीकडून 22 KV वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम गुरुवारी (दि.11) करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंगच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे.
तर गुरुवारी (दि.11) सायंकाळी 5 नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.




