आरोग्य

कोरोना सोबतच डेंग्यू मलेरिया बाबत जागृत राहणे गरजेचे : डॉ.दीपक पाटील

पुणे : आज कोरोना संसर्ग काळात कोरोनाची एवढी दहशत पसरली आहे की साधा थंडी ताप आला की कोरोना संसर्ग झाला की काय अशी शंका उपस्थित होते. नक्कीच काळजी पूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. पण आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात थंडी ताप आजारचे रुग्ण आढळून येतात व त्याचे मुख्य कारण म्हणजे डासांची उत्पत्ती. We need to be aware about dengue malaria along with Corona: Dr. Deepak Patil

डास चावल्यानंतर होणारे आजार प्रामुख्याने मलेरिया व डेंग्यू. ॲनाफिलीस नावाच्या डासा पासून पसरणारा हा मलेरियाचा आजार सभोवताली असणारी दलदल चिखल अस्वच्छता घाणीचे साम्राज्य ह्या मुळे ह्या डासाची उत्पत्ती होते. हा डास ज्या रुग्णाला चावतो. तो दुसऱ्या रुग्णाला चावल्यानंतर ह्या आजराचा प्रसार होतो.

लक्षणे
तीव्र स्वरुपात ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, कधी कधी पोटात दुखणे, उलटी होणे,चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास ह्या मलेरिया हिवताप मुळे होतो. लवकर निदान व लवकर उपचार केले तर निश्चितच हा आजार लवकर बरा होतो, परंतु लवकर निदान व लवकर उपचार झाले नाही तर कधी कधी जीवाला धोका सुद्धा ह्या मलेरिया हिवतापमुळे होऊ शकतो.

Img 20210727 wa0218

मलेरिया हिवताप सारखाच दुसरा आजार म्हणजे डेंग्यू. इडिस इजिप्ती नावाच्या डासमुळे पसरणारा हा एक व्हायरल आजारच आहे. हा व्हायरस एका रूग्णाकडून दुसर्‍या रूग्णाकडे डासाच्या माध्यमातून पसरतो.

लक्षणे
तीव्र स्वरूपातील ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे,
हात पाय गळुन जाणे, चालताना दम लागणे,
पोटात दुखणे, चक्कर  अंधारी येणे

तपासणी/ उपचार
लवकरात लवकर निदान करणे आवश्यक असते. रक्ताच्या तपासण्या करून आपण ह्या आजारचे निदान करू शकतो. आजही भारतात लवकर निदान व लवकर उपचार न मिळाल्यामुळे डेंग्यू आजारचे प्रमाण शरीरात वाढत गेल्यामुळे बरेच रुग्ण मृत्युमुखी पडतात. आज वैद्यकीय विषयातील अचूक निदान व उपचार मुळे निश्चितच हा आजार बरा होऊ शकतो. पण रुग्णांनी आजार अंगावर काढणे बंद केले पाहीजे. तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल
आपला परिसर स्वच्छ साफ ठेवणे आवश्यक आहे..
सभोवताली कोठेही पाणी जमा होणार नाही. पाणी तुंबून राहणार नाही. ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डास प्रतिबंधक औषधांची नियमित फवारणी करणे आवश्यक आहे. घरातील खिडक्या दारे ह्यांना गरजेनुसार डास प्रतिबंधक जाळी बसवणे. गुडनाईट सारखे प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. आज आपण भारतीय कोरोना संसंर्ग नियम पाळत आहोत. परंतु आजमितीस भारतात दररोज असंख्य रुग्ण ज्या आजारचे बळी पडत आहेत त्या मलेरिया हिवताप डेंग्यू ताप सारख्या आजारावर मात आपण केलेली नाही. त्यामुळे लवकर निदान व लवकर उपचार व स्वच्छता हे नियम पाळून आपल्याला ह्या आजारावर विजय मिळवायचा आहे. .

डॉ दीपक पाटील (दिप क्लिनिक कोथरुड)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये