पुणे शहर

गरवारे बालभवनला मिळाली ३० वर्षांची मुदतवाढ ; पुणे महापालिका आणि ओम चॅरिटेबल यांचा संयुक्त प्रकल्प

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नांमुळे मिळाली मुदतवाढ

शहराच्या मध्यवस्तीतील मुलं दीर्घकाळ हसू, नाचू, खेळू, बागडू शकतील.

पुणे : गरवारे बालभवन हा पुणे मनपा व गरवारे यांचा ओम चॅरिटी ट्रस्ट यांचा संयुक्त प्रकल्प आहे. या जागेच्या प्रिमियम ची रक्कम रू. ७३,५१,२२५/- चा, आबासाहेबांची पुढची पिढी आणि रमेश गरवारे यांचे चिरंजीव वायू व दिशा गरवारे यांनी दिलेला धनादेश नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मनपाच्या मालमत्ता विभागाचे आशिष चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ट्रस्ट तर्फे मकरंद पाताडे व गरवारे बालभवन तर्फे सुवर्णा सुखदेव व भारती सुगवेकर उपस्थित होत्या.

मुलांना खेळण्यासाठी जागा राखली गेली आणि मनपाच्या महसुलात वर्षाअखेरीस भर पडली. अशी WIN WIN SITUATION जुळून आल्याबद्दल नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी समाधान व्यक्त केले. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने गेल्या पंचवार्षिक मध्ये बालभवनला ५ वर्षांची मुदतवाढ मिळाली. सुमारे दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता ३० वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

द्रष्टे उद्योगपती आबासाहेब गरवारे यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून आणि तत्कालीन मनपा आयुक्त पु. स. पाळंदे यांच्या सहकार्याने १ सप्टेंबर १९८५ साली गरवारे बालभवन ची सुरुवात झाली. सुरूवातीपासूनच माधुरीताईंचा बालभवनशी विविध कारणांनी संपर्क येत राहिला.गेली ३६ वर्षे मुलांच्या सकारात्मक जडणघडणीचे काम तेथे चालू आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

शोभाताई भागवत यांच्या समर्थ नेतृत्वाखाली टीम बालभवनने उत्कृष्ठ कार्य करून देश विदेशात लौकिक प्राप्त केला आहे.
मानसतज्ञ डॉ. श्यामला वनारसे, श्री. राजपाठक अशा विश्वस्तांचे मार्गदर्शन नियमितपणे लाभले आहे. सध्या डॉ. विदुला म्हैसकर विज्ञानाच्या अंगाने बालविकासास हातभार लावत आहेत.

मुलांना आनंदी बालपण अनुभवायला मिळणे अतिशय मोलाचे असते.अशा ख्यातनाम संस्थेला पुढील ३० वर्षे निर्धोकपणे काम करण्याचे बळ यामुळे मिळाले आहे. असे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये