आंतरराष्ट्रीयसांस्कृतिक

संस्कृती मराठी मंडळाच्या वतीने दुबईमध्ये दसरा मेळावा आणि भोंडला, कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमांचे आयोजन

परदेशात राहून महाराष्ट्रातील परंपरा आणि संस्कृती जपणारे मंडळ.

संस्कृती मराठी मंडळ तर्फे दुबईमध्ये झबील पार्क ( दुबई फ्रेम ) येथे नुकताच विजयादशमीच्या निमीत्ताने कोजागिरी पौर्णिमा, दसरा मेळावा आणि खास महिलांसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले.मंडळांचे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांनी नेमलेल्या कार्यकारी मंडळाने अतीशय सुरेख नियोजन केले.

सुरवातीला श्री गणेशाची पूजा झाल्यावर आरती करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यामध्ये, सर्व महिलांनी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. प्रत्येक महिलेने स्वतः हाताने बनवलेली खिरापत आणली होती. त्यानंतर दांडियाच्या गाण्यावर अतिशय सुरेख डान्स करत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. महिलांसाठी तळ्यात मळ्यात, उखाणे घेणे असे वेगवेगळे खेळ घेतले गेले.

Fb img 1647413711531

काही सभासदांनी दसऱ्याचे माहिती, कोजागिरी पौर्णिमेची माहिती आणि भोंडल्याची माहिती दिली.कार्यक्रमाला जवळपास शंभर सवाशे लोकांनी हजेरी लावली त्यात महिलांचा विशेष सहभाग होता. मंडळातील सभासदांनी एकमेकांना आपट्याचे पान देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

मंडळातील काही सभासदांचे वाढदिवस साजरे झाल्यावर मसाले भात, समोसा, शिरा वगैरे जेवणाची सोय केली होती.चंद्राचे प्रतिबिंब दुधात दिसल्यावर चंद्राची पूजा आणि औक्षण करून सर्वांना चविष्ट मसाले दूध देण्यात आले.

संस्कृती मराठी मंडळ दुबई या मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी मंदार कुलकर्णी साक्षी मोरे,अमित कुडाळकर,मनोज बागल ,अमित मोरे, नितिन अंबरे यांनी या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये