पुणे शहर

कर्वेनगर येथील युनायटेड वेस्टर्न सोसायटी परिसरातील नागरिकांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करू : पोलीस निरीक्षक संतोष बर्गे

कर्वेनगर : युनायटेड वेस्टर्न सोसायटी व डी पी रस्ता परिसरात होणाऱ्या चोऱ्या, चेन स्नॅचिंगचे प्रकार, रस्त्यावर चालणाऱ्या दुचाकींच्या रेस, मुलींची छेडछाड अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी व त्यांच्या इतर तक्रारी सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत नागरिकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. We will take appropriate action on the complaints of the citizens of United Western Society area at Karvenagar: Police Inspector Santosh Barge

या परिसरातील नागरिकांच्या विविध तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर, सोसायटीतील सजग नागरिक संदीप वाळिंबे यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अलंकार पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बर्गे, बांधकाम व्यावसायिक गिरीश दरोडे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, संगीता शेवडे, लक्ष्मीकांत  धडफळे, मयुर कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, मदन वाळवेकर, जसराज जोशी, मालवती मेहेंदळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

रात्री उशीरापर्यंत गल्ल्यांमधे बाहेरील नागरिक गाड्यांमधे दारु पीत बसतात, हॉटेल गिरीजा ते पी के बिर्याणी पर्यंत रात्री उशिरा पर्यंत धिंगाणा चालू असतात, रात्री काही बुलेट व परदेशी दुचाकीस्वार कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाड्या चालवत रेस लावतात,  मुलींची छेड छाडीचे प्रकार, चोऱ्या चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत आहेत. अशा तक्रारी नागरिकांनी यावेळी बैठकीत हिरीरीने मांडल्या.

यावर पोलीस निरीक्षक संतोष बर्गे  यांनी त्वरित कारवाईचे वचन देतानाच, गस्त वाढविणे,नागरिकांनी फोन केल्यावर त्वरित मार्शल पाठविणे यासह काही महत्त्वाच्या सूचना ही केल्या. यात प्रामुख्याने नागरिकांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, बाहेर गावी जाताना मौल्यवान वस्तु घरात न ठेवणे, पहाटे किंवा संध्याकाळी फिरताना महिलांनी दागिने न घालणे, घरकाम करणाऱ्यांची ओळखपत्र झेरॉक्स मागून घेणे, रात्रीच्या वेळी पार्किंग मधील दिवे सुरु ठेवणे, काही गैरप्रकार घडत असल्यास १०० नंबर वर फोन करणे तसेच त्वरित तक्रार दाखल करणे यासह विविध सूचना केल्या.

पोलिस व नागरिक यांच्यातील सुसंवाद व एकमेकांना सहाय्य करण्याच्या भूमिकेतूनच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होइल असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची मदत भासल्यास आम्हाला त्वरित संपर्क करावा असे संदीप खर्डेकर म्हणाले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये