पुणे शहर

‘यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक’ : एच.आर.गायकवाड

‘अ रोड मॅप फॉर इंटरप्रिनर’ या पुस्तकाचे प्रकाशन

चिंचवड : ‘आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तम करा. कोणताही व्यवसाय हा उत्तम कौशल्य, गुणवत्ता पूरक, टिकाऊपणा आणि सातत्य यावर अवलंबुन असतो. आव्हानांची पातळी सातत्याने बदलत आहे. ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेऊन पूरक कृती केली तर निश्चितपणे स्वप्न साकार होते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. हे पुस्तक उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक आहे’, असे प्रतिपादन उद्योजक आणि ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी ग्रुप) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केले. You have to be the best to be a successful entrepreneur’: H.R. Gaikwad

‘बिझ आयुरिस फाउंडेशन’ प्रकाशित जितेंद्र गुप्ता लिखित ‘अ रोड मॅप फॉर एन्टरप्रिनर’ (A Road Map For Entrepreneur) पुस्तकाचे प्रकाशन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ‘बिझ आयुरिस फाउंडेशन’चे हे पहिले पुस्तक असून, पुस्तकाची प्रथम आवृत्ती इंग्रजी भाषेत आहे.

याप्रसंगी पुस्तकाच्या सहाय्यक लेखिका आणि कन्टेन्ट रायटर कल्याणी तुळजापूरकर, फाऊंडेशनच्या सह संचालिका रसना जयतस्वाल, सुपर फास्ट ऑर्थर चे संस्थापक दीपक परबत, प्रशिक्षक आणि लेखक कैलाश पिंजाणी, युवर सारथी’चे संस्थापक संचालक विक्रांत भुजबळराव
परमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनियरिंग अँण्ड सेफ्टी मॅनेजमेंट चे कार्यकारी संचालक वत्सांक प्रजापती, रिओटस एच आर सोल्युशन चे गौरव कुमार आदी उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

पुस्तकाचे लेखक आणि ‘बिझ आयूरीस फाउंडेशन’चे संचालक जितेंद्र गुप्ता बोलताना म्हणाले ‘उद्योजक होण्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा हे उद्दिष्टय ठेऊन केला तर फार काळ टिकत नाही. व्यवसाय करताना आव्हान पेलण्याची क्षमता, नवीन शिकण्याची आवड आणि उत्तम कौशल्य आवश्यक आहे. मार्गदर्शन घेऊन अभ्यासपूर्ण केलेला व्यवसाय उत्तमरित्या चालू शकतो आणि तो अनंत काळापर्यंत टिकतो. उद्योजकीय मानसिकता, वैचारिकता व अर्थपूर्ण जोखीम यावर व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असते. त्यासाठी लागते ते फक्त मार्गदर्शन जे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे.

कल्याणी तुळजापूरकर (पुस्तकाच्या सहाय्यक लेखिका आणि कन्टेन्ट रायटर), संध्या जानराव (एच आर अँड प्रशासक व्यवस्थापक) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. तर सूत्रसंचालन अंजली मिस्टी आणि किशोर काळे यांनी केले. आत्मनिरीक्षण, व्यावसायिक कौशल्ये, नियोजन, बाजार संशोधन, वित्त, कायदेशीर बाबी हे सर्व विषय पुस्तकात समाविष्ट करण्यात आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये