हजारो दिवे लावत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कोथरूडमध्ये स्वागत…

कोथरूडमध्ये दिवाळी दुसऱ्याची अनुभूती
कोथरूड : खासदार झाल्यानंतर दिल्लीला गेलेले मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री होऊनच आज पुण्यात दाखल झाले. हजारो दिवे लावत त्यांचे कोथरूडमध्ये आज स्वागत करण्यात आल्याने आज जणु दिवाळी आणि दसरा एकत्रित साजरा केल्याची अनुभूती कोथरूडकरांना आली.
केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात आले. शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण त्यांचे होम पीच असलेल्या कोथरूड मध्ये त्यांच्या स्वागतासाठी श्रीमानयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्याकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. कोथरुड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांसह विविध भागात हजारो लावुन तसेच साखर पेढे वाटत एक प्रकारे दसरा दिवाळी साजरी करत मोहोळ यांच्या स्वागताच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला गेला.

एक मुलगा कोथरुड मध्ये लहानाचा मोठा होतो, समाजसेवेचे व्रत घेऊन राजकारणात आलेल्या या तरुणावर कोथरुडवासियांनी भरभरुन प्रेम दिले. या प्रेमाच्या जिवावर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत विकासाचे नवे नवे आयाम या तरुणाने प्रस्थापित केले. पुण्याचा खासदार म्हणुन पहिल्यांदाच निवडून गेलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यातील क्षमता ओळखुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना थेट केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिली, केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच पुणे शहरात आले. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याने श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दीपोत्सव करत तो साजरा करण्यात आल्याचे दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.






























