पुणे शहर

अमोल बालवडकर उद्याच्या मेळाव्यात मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

जन आशिर्वाद मेळाव्याद्वारे अमोल बालवडकर करणार मोठे शक्ती प्रदर्शन

विनायक बेदरकर

पुणे : राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून दबाव तंत्राचा वापर होतोय यामुळे माझ्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे.असे म्हणत पाटील यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत अमोल बालवडकर यांनी विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे.दोन दिवसांपूर्वी बालवडकर यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मला अपमानास्पद वागणूक दिली जात असून गेल्या दोन महिन्यापासून मला पक्षातून बहिष्कृत केल्या सारखी वागणूक दिली जात आहे. असे म्हणत बालवडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे उद्या बालवडकर कोथरूड मतदार संघातील बालेवाडी भागात जन आशिर्वाद मेळावा घेणार असून या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
बालवडकर म्हणाले,मी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून माझी तक्रार दिली आहे. मी अजून हि भारतीय जनता पक्षातच आहे. आणि भारतीय जनता पक्ष मला विधानसभेचे तिकीट देईल असा मला विश्वास आहे.

मात्र मी ज्यांना व्हीआयपी मानतो. अशा कोथरूड मतदार संघातील जनते सोबत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर जनता रुपी व्हीआयपी बसणार आहेत. तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. अशी भुमिका बालवडकर यांनी घेतली आहे. या मेळाव्यामध्ये 35 ते 40 हजार लोक सहभागी होणार आहेत.त्यामुळे उद्या होणाऱ्या मेळाव्यात अमोल बालवडकर नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उद्याच्या जन आशिर्वाद मेळाव्याची जय्यत तयारी

उद्या (ता.6 ऑक्टोबर, रविवार) सकाळी 10 वाजता अमोल बालवडकर यांच्या वतीने कोथरूड मतदार संघातील बालेवाडी हाय स्ट्रीट मैदानावर उद्याच्या जन आशिर्वाद मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून 35 हजार नागरिकांसाठी ची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी जर्मन हँगर पद्धतीची भव्य मांडव व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सर्व नागरिकांना दिवाळी सरंजाम किट चे वाटप हि करण्यात येणार आहे. या मेळाव्याद्वारे अमोल बालवडकर मोठे शक्ती प्रदर्शन करणार असून त्यांची राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहे.

Img 20241005 wa0009315269334016817164

अमोल बालवडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामुळे कोथरूड भागातील वातावरण तापले असून अमोल बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत.

Img 20240404 wa001528129

कोथरूड मतदार संघा मध्ये 2014 साला पासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी 65 हजार मतांचे प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला. तर 2019 साली भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 25 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये