अजित पवारांच्या पुणे जिल्हा बँकेच्या राजीनाम्या मागे कोणती राजकीय खेळी?

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या कामाचा व्याप वाढला असल्याने हा राजीनामा त्यांनी दिला असल्याची माहिती मिळत आहे, मात्र यामागे वेगळे राजकारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार यांनी दिलेल्या संचालक पदाच्या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता असून ती निवडणूक कोण लढवणार याबाबतही आता चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा दिलेला राजीनामा ही जिल्ह्यातील राजकारणातील राजकीय खेळी असू शकते. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेवर कोणाला संधी मिळणार, ती निवडणूक काशी होणार याबाबत तर्क लढवले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेली फूट त्यामुळे निर्माण झालेले अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट आणि आता त्यानंतर अजित पवार यांच्या जिल्हा बँकेच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेची निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.













