पुणे शहर

मेट्रो स्टेशनवर पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची ? पुणे अर्बन सेलच्या मागणीनंतर सत्य आले पुढे

पार्किंग शुल्काचा मुद्दाही एरणीवर

पुणे : pune metro पुणे मेट्रो मार्गावरील सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असले तरी ही व्यवस्था कोणी करायची याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.    ही व्यवस्था करण्याबाबत मेट्रो प्रशासनाने हात झटकले आहेत. Pune urban cell पुणे अर्बन सेलच्या पार्किंगच्या मागणी नंतर सदर जबाबदारी मेट्रो प्रशासनाची नसून पुणे मनपाची असल्याचे सांगत मेट्रो प्रशासनाने मनपाची आणखी एक जबाबदारी प्रकाशात आणली आहे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

पुणे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांची पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन नागरिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मागण्या पुणे अर्बन असेल वतीने निवेदनाद्वारे केल्या. तसेच अनेक मुद्द्यांकडे मेट्रो प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

मेट्रो स्टेशनवर मेट्रो पार्किंगमध्ये प्रवाशांसाठी २५% सवलत असून सदर सवलत ५०% करण्यात यावी, अशी मागणी पुणे अर्बन सेलचे सभासद मदन वाणी यांच्या हस्ते देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली यावेळी  अर्बन सेलमधील युसूफ शेख, कसबा विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, कोथरूड अर्बन सेल अध्यक्ष सचिन यादव आदी उपस्थित होते.

अनेक नागरिकांची घरे आणि मेट्रो स्टेशन यातील अंतर अधिक असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असून याचसह पार्किंग सुविधा कमी खर्चात उपलब्ध असणेही आवश्यक आहे. पार्किंगचा मेट्रो विभागाने ठरविलेला ७.५० रुपये प्रतितास खर्चाचा मेळ घातला असता प्रतिव्यक्ती नागरिंकाचा कामाचा ८ तास गृहीत धरल्यास ६० रुपये खर्च येतो. पार्किंग शुल्क अधिक मेट्रो तीकिट आणि खाजगी वाहनांचा खर्च यातील फरकामधे वाहनांचा खर्च नगण्य असल्याने नागरिकांकडून याचा वापर होणे शक्य नाही,  ही बाब यावेळी मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

Img 20240404 wa0013281291032765212350995267

पुणे शहरात मेट्रोचा विकास होत असताना मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे, क्रमप्राप्त आहे. काल सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये पार्किंग करिता दुचाकीसाठी प्रति तासासाठी १५ रुपये, तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी ३५ रुपये आकार घेतला जात होता. ही नागरिकांची लूट महामेट्रोने वेळीच थांबवली असली तरी पार्किंगच्या शुल्काचा प्रश्न मोठा असून त्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.

मेट्रो स्टेशनला पार्किंगची व्यवस्था करणे ही जबाबदारी पुणे मनपाची असल्याचे नागरिकांना माहिती नसून मनपाकडूनही यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात आलेली दिसत नाही. पुणे महापालिकेने मेट्रोच्या स्टेशनला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रो स्टेशनवर पार्किंग व्यवस्था यावर अधिक लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असून त्या अनुषंगाने काम करावे अशी मागणी पुणे अर्बन सेल द्वारे करण्यत आली आहे.

Img 20240404 wa0012281298841886320058264868

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये